`डर्टी पिक्चर करनेवाली डर्टी भाषा बोल गयी` लष्करी जवानाचे कवितेच्या माध्यमातून विद्याला प्रतिउत्तर

vidya balan

टीम महाराष्ट्र देशा – एका लष्करी जवानाने आपल्याशी गैरवर्तन केलं असल्याचा जुना अनुभव अभिनेत्री विद्या बालनने नुकताच एका मुलाखतीत सांगितला. त्याला आणखी एका लष्करी जवानाने सोशल मीडियावर गलिच्छ भाषेत उत्तर दिल्याने तो चर्चेचा विषय बनलाय.

त्यात सध्या #metoo कॅम्पेनमुळे लैंगिक शोषणाबद्दल उघडपणे चर्चा होताना दिसत आहे. यातून अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आयुष्यातील काही वाईट प्रसंग सर्वांसमोर आणले आहेत. अभिनेत्री विद्या बालनने एका मुलाखतीवेळी आपल्या आयुष्यातील असाच एक प्रसंग सर्वांसमोर आणला.

 

विद्याने हा अनुभव शेअर केल्यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून एका जवानाने विद्याच्या विरोधात कविता केली आहे. `डर्टी पिक्चर करनेवाली डर्टी भाषा बोल गयी`, अशी सुरुवात असणारी ही कविता सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. एका फेसबूक पेजवरुन ही कविता व्हायरल झाली आहे.Loading…
Loading...