निवडणूक खर्च सादर न करणारे 77 उमेदवार 5 वर्षांसाठी अपात्र

Announcement of election program for president of Marathi Sahitya Sammelan

टीम महाराष्ट्र देशा –  जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवून प्रशासनाकडे निवडणूक खर्च दाखल न  77 उमेदवारांवर अखेर जिल्हाधिकार्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या पराभूत उमेदवारांना पाच वषारची निवडणूक बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच पुढील जि.प. पं.स. निवडणूक या उमेदवारांना लढविता येणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यावर्षी तब्बल 1600 उम ेदवारांनी निवडणूक अर्ज भरले होते. निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्च प्रशासनाकडे दाखल करावा लागतो. त्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक निकाल लागून सहा महिने लोटले तरी अनेक उमेदवारांनी प्रशासनाकडे निवडणूक खर्च दाखल केला नाही.