३६ महिलांचं पथक स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानाच्या सुरक्षाकरिता लाल किल्ल्यावर तैनात!

नवी दिल्ली : देशातलं पहिलं महिला स्पेशिल वेपन्स अँड टॅॅक्टिस म्हणजेच SWAT कमांडो पथकाची स्थापना करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी हे ३६ महिलांचं SWAT कमांडो पथक लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना सुरक्षा देताना दिसणार आहे. त्याचबरोबर हे महिलांचं SWAT कमांडो पथक इंडिया गेटवर देखिल तैनात असणार आहे.

या SWAT पथकातील सर्व महिला ह्या ईशान्य भारतातल्या आहेत. या पथकासाठी महिला कमांडोंनी १५ महिन्याचं अथक परिश्रम घेतलं आहे. या पथकाला देशीबरोबर विदेशी प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले आहे. या पथकाला आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे. या महिला SWAT पथकाने पुरुषाचं SWAT मधील वर्चस्व संपुष्ठात आणलं आहे.

… तर पोलीस करणार मोबाईल जप्त

भाजपा प्रचाराची धुरा महिलांच्या हाती

Gadgil