औरंगाबादेमधील १९०० एसटी कर्मचा-यांची होणार वेतन कपात

टीम महाराष्ट्र देशा – एसटी महामंडळाने संपकरी कर्मचा-यांची ३६ दिवसांची वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. २६०० पैकी १९०० कर्मचारी संपात सहभागी झाले होते. या वेतन कपातीला औरंगाबादेत विरोध होत असून, एसटी कर्मचा-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एसटी महामंडळातील कर्मचा-यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी १७ ते २० आॅक्टोबरदरम्यान संप करण्यात आला. या चार दिवसांच्या कालावधीत औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यातील ५०० बसेसपैकी एकही बस बसस्थानकाबाहेर पडली नाही. २६०० पैकी १९०० कर्मचारी संपात सहभागी झाले.

झालेल्या नुकसानीबद्दल प्रत्येक दिवसासाठी ८ दिवस याप्रमाणे एसटीच्या या संपकरी कर्मचा-यांचे ३६ दिवसांची वेतन कपात करण्याचा निर्णय सोमवारी (दि.३०) एसटी महामंडळाने घेतला. यामध्ये या महिन्यात ४ दिवसांचा पगार कापला जाईल. उर्वरित ३२ दिवसांचा पगार पुढील ६ महिन्यांत कापला जाणार आहे. या निर्णयाची माहिती पोहोचताच कर्मचारी आणि संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सोशल मीडियावरही याचे तीव्र पडसाद उमटले.

You might also like
Comments
Loading...