fbpx

नगरपंचायतींचा नगराध्यक्षही आता थेट जनतेतून

mantalya

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नगरपंचायतींचा नगराध्यक्षही आता थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यासाठी अध्यादेश काढण्यात आला, यासोबतच एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
ग्रामपंचायत सरपंच थेट नागरिकांतून निवडण्याच्या निर्णयानंतर आता नगरपंचायतींचा नगराध्यक्षही आता थेट जनतेतून निवडला जाणार. त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता लवकरच नगरपंचायतीचे नगराध्यक्ष देखील नागरिकांतून निवडले  जाणार असल्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीना  फार महत्व प्राप्त होणार आहे.