का म्हणतात आदित्य ठाकरेंना ‘पेंग्विन’ ? धनंजय मुंडेंनी सांगितले रहस्य

Dhananjay_Munde_0

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहे. त्यामुळे सगळेच पक्ष आता मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांनीही कार्यकर्त्यांच्या बैठका, सभा आणि मेळावे घेण्यात व्यस्त आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे.

या यात्रेत धनंजय मुंडेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरेंना पेंग्विन का म्हणतात याचाही खुलासा केला आहे. धनंजय मुंडेंच्या मते पेंग्विनचं पिल्लू मेल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले, त्यामुळे त्यांना मुंबईत पेंग्विनच म्हणतात असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना मुंडे यांनी राजकीय भ्रष्टाचार करणारी भाजपसारखी दुसरी पार्टी नाही अशी जोरदार टीका भाजपवर केली आहे. तसेच जनतेला शेततळी दिली ती याअगोदर कधी दिली गेली नाहीत म्हणून दिली असे मुख्यमंत्री सांगत होते परंतु ती सध्या गुप्त आहेत ती फक्त भाजपच्या पुण्यवान लोकांनाच दिसतात. जलयुक्त योजनेत मुरलेले पाणी फक्त भाजपच्या पुण्यवान लोकांच्या मुखात पडते असा जोरदार टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

दरम्यान, याचं सभेत बोलताना अमोल कोल्हे यांनी ‘माता भगिनींनो तुम्हाला जास्त महत्व आहे. तुमच्या आशा – आकांक्षाना सुरुंग लावणाऱ्या  सरकारला खाली खेचण्याचे काम करायचं आहे असं आवाहन राज्यातील महिलांना आवाहन केले आहे.