राज यांच्या चौकशीतून काही निघणार नाही, उद्धव ठाकरेंनी केली भावाची पाठराखण

टीम महाराष्ट्र देशा: कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर राज यांच्या चौकशीतून काही निघणार नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अडचणीच्या प्रसंगी उद्धव ठाकरे भावाची पाठराखण करताना दिसत आहेत.

कॉंग्रेसच्या निमर्ला गावित आणि राष्ट्रवादी काँगेसच्या रश्मी बागल यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांना ईडीकडून बजावण्यात आलेल्या नोटीसबद्दल विचारले. तर ईडीच्या चौकशीतून काही साध्य होईल, असं मला वाटत नाही, म्हणत उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंची पाठराखण केली.

Loading...

ठाण्यात मनसैनिकांची आत्महत्या

राज ठाकरे यांना कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आपल्या नेत्यांला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याच्या मानसिक तणावामधून एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवीण चौगुले असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ