सगळ्यांना पक्षात घ्या फक्त पवार कंपनी तिथेच राहू द्या ; उद्धव ठाकरेंची फडणवीसांना विनंती

टीम महाराष्ट्र देशा : आता विरोधी पक्षनेते कुणाला तरी केलं आहे, तर त्यांना भाजपमध्ये घेऊ नका, अजित पवारांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. सगळ्यांना घ्या फक्त पवार कंपनी तिथेच राहू द्या, त्यांना घेऊ नका असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

आज ( १९ जून ) शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन, वर्धापन दिनानिमित माटुंगा येथील षण्मुखांनाद सभागृहात सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांकडे अशी काय शक्ती आहे काही माहिती नाही. आम्ही विरोधी पक्षात उतरणार होतो तर आम्ही तुमच्यासोबत आलो. राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेते होते तर ते देखील भाजपमध्ये आले. आता विरोधी पक्षनेते कुणाला तरी केलं आहे, तर त्यांना भाजपत घेऊ नका असे अजित पवारांनी सांगितलं आहे, असे ठाकरे म्हणाले. सगळ्यांना घ्या फक्त पवार कंपनी तिथेच राहू द्या, त्यांना घेऊ नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

Loading...

इतकेच नव्हे तर, नरेंद्र मोदीच्या पंतप्रधान होण्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. मला दुसऱ्यांच्या पराभवानंतर आनंद साजरा करायला आवडत नाही. मात्र सावरकरांना डरफोक म्हणणाऱ्यांना हरवलं यांचा आनंद आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात