fbpx

महाराष्ट्राच्या गादीवर ३५० वर्षानंतर पुन्हा छत्रपती ?

टीम महाराष्ट्र देशा : छञपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज असलेले उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. उदयनराजे हे त्यांच्या निर्भीड स्वभावासाठी प्रसिध्द आहेत. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. साक्षात शिवछत्रपतींचे वंशजच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला नक्की फायदा होईल, असा अंदाज शरद पवार यांना वाटत आहे. त्यामुळे विधानसभेला उदयनराजे यांचा चेहरा पुढे करण्याबाबत चाचपणी सुरु आहे. छत्रपतींना मत म्हणजे राष्ट्रवादीला मत या न्यायाप्रमाणे मतदार मतदान करेल आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल. अशी अपेक्षा राष्ट्रावादीने ठेवली आहे. मात्र  कोणत्याच कार्यक्रमाला हजर न राहणारे उदयनराजे राज्यभर पक्षाच्या कार्यक्रमाला जात आहेत. दरम्यान, त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागांना भेटी दिल्या.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत कायम कॉंग्रेस विचारसरणीचे सरकार सत्तेवर आले आहे. 1995 च्या युती शासनाचाअपवाद, पण 2014 नंतर महाराष्ट्राची समीकरणे बदलली. भाजपचे सरकार महाराष्ट्रात आले .आणि आता लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या सहा महिन्यांत काही बदल घडेल असे वाटत नाही. या घडामोडीत शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व शांत बसेल असे वाटत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच एखादा चेहरा निवडणुकीत पुढे केल्यास त्याचा फायदा होतो. हा अत्तापर्यंतचा इतिहास आहे. नरेंद्र मोदी हे त्याच उदाहरण आहे. उदयनराजे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील का हे, महाराष्ट्रातील विविध घडामोडीवर अवलंबून असणार आहे. उदयनराजे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.