रितेशचा चाहत्यांना ‘स्माईल प्लीज’चा सल्ला

टीम महाराष्ट्र देशा- मागील काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ‘विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने नुकतेच त्याच्या सोशल मीडियावर लाँच केले आहे. या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत आहे. आयुष्यातील हसण्याचे क्षण अधोरेखित करणारे हे पोस्टर निश्चितच डोळ्यांना सुखावणारे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात, परंतु त्याकडे सकारात्मकतेने बघून, जीवनाची पुनर्मांडणी करण्यास शिकवणारा ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Loading...

या चित्रपटात प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट प्रेक्षकांनाही जगण्याची नवीन उमेद देऊन, चेहऱ्यावर नक्कीच स्माईल आणेल.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका