…अन् पूरग्रस्तांना मदत घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला सुप्रिया सुळेंनी बांधली राखी

टीम महाराष्ट्र देशा: सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला राखी बांधत खा. सुप्रिया सुळे यांनी सुखद धक्का दिला आहे. गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गोळा करण्यात आलेले साहित्य ट्रक चालक नितिन विष्णू बेंद्रे घेऊन निघाले होते. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीकडे जाता आलं नाही याची खंत नितिन बेंद्रे यांना होती. मात्र मुंबई कार्यालयातील ध्वजवंदनानंतर सुळे यांनी स्वतः विष्णू बेंद्रे यांना राखी बांधत सुखद धक्का दिला.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे हजारो संसार उघड्यावर आले आहेत. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना अनेक समाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी मदतीचा हात पुढे केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार आमदारांसह लोकप्रतिनिधीचे एक महिन्याचे ५० लाखांचे मानधन पूरग्रस्तांना दिले आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांनी देखील संसार उपयोगी साहित्य जमा करत पूरग्रस्तांना मदत केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे स्वतः तीन दिवसांपासून सांगलीमध्ये तळ ठोकून असून पूरग्रस्तांना मदत करत आहेत. तर पवार यांनी बारामतीमध्ये काही तासामध्ये पूरग्रस्तांसाठी १ कोटीचा निधी उभारला आहे.

महत्वाच्या बातम्या