fbpx

स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडून ६०६ कोटींचा निधी मंजूर

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने अर्थसंकल्पात स्वराज्याची राजधानी ‘रायगड’साठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललेलं आहे. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने ६०६ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने स्वराज्याची राजधानी रायगडसाठी मोठं आणि महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. रायगडच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याची आमची तयारी आहे. सध्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने ६०६ कोटींचा निधी मंजूर केला आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पुणे जिल्ह्यातील शिवछत्रपती प्रतिष्ठान आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ओजस्वी जीवनावरील शिवसृष्टीची निर्मिती होत आहे. या प्रकल्पासाठी २०१९-२० या आर्थिक वर्षात ५० कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हंटले.

तसेच, रायगड किल्ल्याच्या विकासासाठी ६०६ कोटींच्या मंजूर निधीपैकी ५९ कोटी रूपयांचा निधी खर्च झाला असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हंटले.