fbpx

राजीनामा दिलेल्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे सिद्धरामय्यांची मागणी

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकातील राजकीय नाट्य सुरूच आहे. या नाट्यात आता सस्पेंन्स आणखी वाढला असून विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी काँग्रेस – जेडीएसच्या १४ आमदारांचे राजीनामे नामंजूर केले आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे आता कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे.

कर्नाटकात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते रोशन बेग यांनीही आमदारकीचा राजीनामा दिल्याने कॉंग्रेस आणखी अडचणीत आली आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी राजीनामे दिलेल्या आमदारकीचे राजीनामे देऊन भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्या बंडखोर काँग्रेस आमदारांचे पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे. याआधी सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात सर्व काही ठिक असून कुमारस्वामी सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला होता.