लहान मेंदूत कचरा साचला की… संजय राऊत यांचा पानसेंवर निशाणा

sanjay raut & abhijeet panse

मुंबई: ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी रंगलेल्या मान-अपमान नाट्यानंतर आता मनसे आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु झाल्याच पहायला मिळत आहे. खा. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटनंतर आता हा वाद आणखीन वाढल्याच दिसत आहे. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे ट्विट जय राऊत यांनी केलेआहे. या ट्विटच्या माध्यमातून राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

https://twitter.com/rautsanjay61/status/1088318562706571264

मनसे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग मुंबईत आयोजित करण्यात आले होते. यावेळी मानपानाचे नाट्यरंगले. स्क्रीनिंगवेळी सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे नाराज झाले, त्यामुळे ते स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले. मुंबईत होणाऱ्या या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं होत. पण ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे यावेळी मानपानाचे नाट्य चांगले रंगलेले पाहायला मिळाले. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आलं नाही.

आता हा वाद आणखीनचं वाढला आहे. सोशल मीडियावर मनसेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाची मोहीमही सुरु केली आहे. त्यावरुन मनसे कार्यकर्ते अभिजीत पानसेंचं समर्थन करण्यासह शिवसेनेवर टीकाही करत आहेत. दरम्यान, ठाण्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी अभिजित पानसे यांना समर्थन देत ट्वीट केले आहे. यामध्ये ‘आज परत तेच झालं..शिवसेनेने अभिजित पानसेचा वापर केला, पहिल्यांदा आदित्य ठाकरेला तयार करण्यासाठी आणि आज ठाकरे सिनेमा बनवण्यासाठी… राज साहेब बरोबर बोलले होते अभिजित हे तुला फसवणार’.. असे ट्वीट मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.

तर आता संजय राऊत यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय बनले आहे.