fbpx

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा येणार पहिला मराठी चित्रपट

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता संजय दत्त ‘बाबा’ नावाचा मराठी चित्रपट घेऊन मराठीत पदार्पण करत आहे. ‘बाबा’ हा चित्रपट संजय दत्त यांनी स्वतः निर्मित केला आहे. याबाबत त्यांनी स्वतः च्या ट्विटरवरून या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला आहे. २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे.  माझ्या आयुष्यातील चांगल्या वाईट प्रसंगी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणाऱ्या माझ्या बाबांना मी माझा पहिला चित्रपट अर्पण करत आहे, असं भावनिक ट्वीट संजय दत्त यांनी केलं आहे.

अभिनेता संजय दत्त यांना टोपण नावाने ‘संजू बाबा’ असे देखील बॉलिवूडमध्ये संबोधण्यात येते. याआधीही संजय दत्त यांच्या आयुष्यावर रणबीर कपूर या अभिनेत्याने ‘संजू ‘ हा सिनेमा केला होता. संजूमध्ये संजय दत्त व त्यांचे वडील यांच्यामधील नाते उलगडण्यात आले होते. संजय दत्तचे आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे. ‘बाबा’ या चित्रपटात देखील वडील व मुलगा यामधील नाते स्पष्ट होताना या टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.