मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

renuka shane b day speical

हम आप कै है कोन? या चित्रपटात सलमान खानची क्युट वाहिनीचा रोल करणारी अस्सल मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे हिचा आज वाढदिवस आहे. रेणुका शहाणे हिचा जन्म महाराष्ट्रात झाला असून  रेणुका मुंबईतच लहानाची मोठी झाली. ती कला शाखेची पदवीधर असून मुंबईच्या सेंट झवेरीस कॉलेज मधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.क्लीनिकल सायकोलॉजी मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

renuka shane b day speical
file photo

हाच सुनेचा भाऊ या मराठी चित्रपटातून रेणुकाने तिच्या फिल्मी करियरला सुरुवात केली. यानंतर सह्याद्रीवरील सुरुभी या मालिकेत तिने काम केले. या मालिकेत तिच्या सोबत किटू गिडवानी, पल्लवी जोशी, मंदिरा बेदी या सारख्या त्या वेळेच्या आघाडीच्या टी. व्ही. अभिनेत्रीसोबत रेणुकाने काम केले.

renuka shane b day speical
file photo

१९९४ मध्ये आलेल्या हम आप कै है कोन? या चित्रपटाने रेणुकाच्या फिल्मी करियरला वेगळेच वळण दिले. हा चित्रपट खूप गाजला या चित्रपटातील अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या बहिणीचा रोल रेणुकाने केला होता. साधी, सरळ, हसरी रेणुका चित्रपटात स्वताची एक वेगळी छाप पाडून गेली.

हुन हुन्शी हुनशिलाल १९९२ मध्ये आलेला हा रेणुकाचा पहिला हिंदी चित्रपट जो फार काही चालला नाही. रेणुकाने राम गोपाल वर्मा यांच्या मनी या तेलगु चित्रपटात देखील काम केले. मनी हा तेलगु मधील गाजलेल्या चित्रपटापैकी एक आहे. रेणुकाने अनेक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले याबरोबर तिने अनेक टेलीव्हिजन मालिकांमध्ये देखील काम केले आहे. १९९४ मध्ये आलेल्या अबोली या मराठी चित्रपटासाठी रेणुकाला फिल्मफेअर देण्यात आले.

renuka shane b day speical
file photo

रेणुका शहाणे हिने अभिनेता आशुतोष राणा याच्याशी विवाह केला असून. रेणुकाला दोन मुल आहेत. झलक दिख ला जा या रियालिटी शो मध्ये रेणुका झळकली होती. रेणुकाने आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने फेसबुकवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर करीत जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे.

renuka shane b day speical
file photo