अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल लोकांच्या मनातील चिंता वाढली ; घटते रोजगार सर्वाधिक चिंतेचा विषय

रिझर्व्ह बँकेच्या नवीन सर्वेक्षणाचा अहवाल

देशभरामध्ये गेले अनेक दिवसापासून चर्चा होती ती घसरत्या विकास दरबाबत. एरवी सामान्य जनतेला विकास दराबाबत जास्त काही घेणे-देणे नसते पण नोटाबंदी, जी एस. टी नंतर सामान्य नागरिकांनी देखील देशभरात मंदी जाणवू लागली आहे. आणि सामान्य नागरिकांना देखील विकास दर काय आहे ते समजू लागले.

मागील आठवड्यात आरबीआयने पतधोरण जाहीर केले आणि विकास दर खाली आल्याचे सांगितले. पतधोरण जाहीर केल्यानंतर सामान्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे कारण सामान्य जनतेला आरबीआयवर फार विश्वासार्ता आहे. आरबीआयने देखील नागरिकाचे सर्वेक्षण करीत एक अहवाल सादर केला आहे.

खरेदीबद्दलची उदासीनता, बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि घटता विकास दर, अशी चिंताजनक परिस्थिती रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. गेल्या चार तिमाहींपासून सामान्य ग्राहकाच्या मनात आर्थिक परिस्थितीविषयी चिंता असल्याचे आरबीआयचे सर्वेक्षण सांगते. यामध्ये सर्वाधिक चिंता रोजगाराची आहे.
मागील वर्षातील सप्टेंबरच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यातील परिस्थिती बिघडली असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. ‘सप्टेंबर २०१७ मध्ये आर्थिक परिस्थिती सुधारली

रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना अर्थव्यवस्थेच्या एकूण स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणातूनही हीच बाब अधोरेखित झाली आहे. ऑगस्ट महिन्यात द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना विकास दर ७.३ टक्के इतका राहिल, अशी अपेक्षा आरबीआयने व्यक्त केली होती. मात्र यंदा पतधोरण जाहीर करताना विकास दर ६.७ टक्के राहिल, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला.

आरबीआयने मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बंगळुरुमध्ये सर्वेक्षण केले होते. यामध्ये ५,१०० लोकांची मते विचारात घेण्यात आली. देशातील आर्थिक स्थिती, रोजगार, महागाई, उत्पन्न यांच्याबद्दलचे प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्यक्तींना विचारण्यात आले. रोजगाराचा प्रश्न सर्वाधिक बिकट असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले.

You might also like
Comments
Loading...