एस.टी. प्रशासनाबाबत खा.रणजितसिंह निंबाळकर म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : फलटण आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७१व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्याने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आगार कार्यालयास भेट दिली. त्यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आगार कार्यालयास शुभेच्छा दिल्या.
याच पार्श्वभूमीवर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून गाव तेथे एसटी ही संकल्पना राबविताना सर्वसामान्य माणूस, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी यांच्यासाठी वाहतुकीची खात्रीशीर व आपुलकीची सेवा देणारे महामंडळ ही भूमिका गेल्या ७१वर्षात एसटीने यशस्वीरित्या राबविल्याचे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

या कार्यक्रमावेळी प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार हे उपस्थित होते. राहुल कुंभार यांचे स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आहे. याच दरम्यान नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीही यावेळी एसटी प्रशासनाला शुभेच्छा दिल्या.