आघाडीला धक्का स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेच्या ४९ जागा लढवणार

blank

पुणे – लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या भरवश्यावर निवडणूक लढविणाऱ्या स्वभिमानीला चांगलाच फटका बसला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना देखील नवख्या उमेदवाराने पराभवाची धूळ चारली . या धक्क्यातून सावरत आता स्वभिमानीने विधानसभेची तयारी सुरु केली आहे. ‘विधानसभेची निवडणूक महाआघाडीतून लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र, ४९ जागांवर निवडणूक लढविणार आहे,’’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यात केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, दशरथ सावंत, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी विधानसभेची निवडणूक मी लढणार नसून पक्षाच्या सक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल असे सांगून त्यांनी निवडणूक लढविण्याच्या विषयावर शेट्टी यांनी पडदा टाकला.