fbpx

मोदींच्या मंत्रिमंडळात राजनाथसिंहचं दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री

ram-rahim-guilty-rajnath-singh-calls-for-high-level-meet

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे पहिले अधिवेशन सोमवारी सुरु झाले. यावेळी नवोदित खासदारांना शपथविधी देण्यात आला. मात्र या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारमध्ये अमित शहा हे गृहमंत्री झाल्याने दुसऱ्या  क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र १७ व्या लोकसभेत सभागृहात पंतप्रधान मोदींच्या बाजूला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आसन देण्यात आल्याने तेच दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कोण कुठल्या जागेवर बसणार, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. अमित शहा गृहमंत्री झाल्याने त्यांना सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा दर्जा मिळू शकतो, अशी चर्चा होती. मात्र, पंतप्रधानांच्या बाजूचे आसन राजनाथ सिंह यांना देण्यात आले. तर यावेळी अमित शहा हे सुषमा स्वराज यांच्या जागेवर बसले होते. तर लालकृष्ण आडवाणी यांची जागा राजस्थानमधील खासदार थाकरचंद गेहलोत यांना मिळाली आहे.