पुणे मॉल-मल्टिप्लेक्स मधील पार्किंग होणार फ्री; महापालिकेचा मोठा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : पुणे महापालिकेने मॉल-मल्टिप्लेक्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे, मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये खरेदीसाठी येणाऱ्यांना मोफत पार्किंगचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मॉल आणि मल्टिप्लेक्स पार्किंगसाठी भरमसाठ पैसे घेतले जातात. वाहनचालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शहर सुधारणा समितीने सर्वसामान्यांची अशी गैरसोय होऊ नये म्हणुन मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये खरेदीसाठी येणाऱ्या वाहनचालकाकडून पार्किंग शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या सुधारणा समितीने शुक्रवारी मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये खरेदीसाठी येणाऱ्या वाहनचालकाकडून पार्किंग शुल्क घेऊ नये, असा ठराव केला आहे. पार्किंग शुल्क घेणाऱ्या मॉल व्यवस्थापनाविरोधात कारवाई होणार आहे. अशी माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दिली आहे.