fbpx

अफवांना पूर्णविराम, या तारखेला लागणार दहावीचा निकाल

पुणे : बारावीनंतर आता दहावीच्या निकालाची उत्सुकता लागली असतानाच, निकालांच्या अनेक तारखा वर्तवल्या जात होत्या. आणि आता बोर्डाने अधिकृत तारखेची घोषणा केली आहे. उद्या म्हणजेच ८ जून रोजी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर होणार आहे.

– येथे पहा निकाल ?

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

– असा पहा दहावीचा निकाल

दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुमचा बोर्ड परीक्षा क्रमांक जवळ असावा लागणार आहे. तूम्ही रिझल्ट वेबसाईटवर गेल्यावर, तिथे परीक्षा क्रमांक टाईप करावा लागले. कुठल्याही स्पेसशिवाय तुमचा परीक्षा क्रमांक टाईप करा. त्यानंतर आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं टाईप करा. त्यानंतर क्लिक करून दहावीचा निकाल पाहता येणार आहे.