मंत्र्याला वाचविण्यासाठी सरकार वकिलाला प्रतिदिन सुनावणीसाठी अडीच लाख रुपये देणार – डावखरे

jitendra aavhad

मुंबई – राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून आपणास मारहाण झाल्याचा आरोप अनंत करमुसे या तरूणानं केला होता. अनंतने वर्षभरापुर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. आव्हाडांना त्या पोस्टचा राग आल्यानं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यावर नेत मारहाण केल्याचा आरोप या तरूणानं केला आहे.

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राज्यसरकारवर चौफेर टीका झाली होती. सध्या या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी चालू असून अनंत करमुसे यांची बाजू ऍड. अनिरुद्ध गानू मांडत आहेत.करमुसे यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत असे दिसून येत आहे.

दरम्यान, दिनांक १० मे रोजी सरकारच्या गृह विभागाने सदर खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अनिल साखरे यांची नेमणूक केली असून त्यांना प्रत्येक सुनावणीला अडीच लाख रुपये व्यावसायिक फी म्हणून देण्यात यावेत असा शासन निर्णय झाला आहे.आता या प्रकरणातील वकिलाच्या फी मुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने आता याच मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली आहे. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ट्वीत करत आव्हाड आणि राज्यसरकारवर हल्ला चढवला आहे.

सामान्य मााणसाला मारहाण करणाऱ्या कॅबिनेट मंत्र्याला वाचविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार उच्च न्यायालयात प्रतिदिन सुनावणीसाठी वकिलाला दररोज अडीच लाख रुपये देणार आहे. तर कोविड आपत्तीत सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना पैसे दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत राज्य सरकार कोणाचे हित जपत आहे?, असा सवाल भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP