fbpx

…या निर्णयामुळे 17 लाख विद्यार्थ्यांवर अन्याय – युवासेना

टीम महाराष्ट्र देशा – एसएससी बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांची 20 गुणांची तोंडी परीक्षा रद्द केली. या निर्णयाविरोधात युवासेनेने SSC बोर्डावर धडक मोर्चा काढला.

एसएससी बोर्डाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 17 लाख विद्यार्थ्यांवर शालेय शिक्षण विभागाने अन्याय केला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या पाठीशी युवासेना ठामपणे असल्याचे यावेळी यावसेनेने म्हटले आहे.

याआधी युवासेनेने शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले होते, निर्णय रद्द करण्यासाठी ऑनलाइन सहय़ांची मोहीमसुद्धा राबवली होती मात्र तरीही निर्णय बदलला नाही.
त्यामुळे त्या निर्णया विरोधात आज युवासेनेने मोर्चा काढत शिक्षण मंडळाला युवासेनेने निवेदन दिले आहे.

यावेळी बाळा कदम म्हणाले, “शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दहावी मधील विद्यार्थ्याच्या तोंडी परीक्षेचे 20 गुण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 15 लाख विद्यार्थ्याच निर्णयामुळे नुकसान होणार आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करीत असून हा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यात आधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

1 Comment

Click here to post a comment