ऊस शेती काय टाटा-बिरलाची नाही तर ऊस शेती ….- शरद पवार

ncp shard pawar

टीम महाराष्ट्र देशा – ऊसाच्या प्रश्नावर आंदोलन करणार्यांना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी फटकारले आहे.दुधात कोणी मिठाचा खडा टाकू नये. आज काही जण ऊस तोड बंद पाडत आहेत. पण ऊस शेती काय टाटा-बिरलाची नाही, ऊस शेती ही शेतकऱ्यांची आहे, हे आंदोलन करणार्यांनी लक्षात ठेवावे’, असा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लगावला आहे.

सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे शेतकरी मेळाव्यात पवार हे बोलत होते. यावेळी सहकारी क्षेत्रात देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या क्रांती साखर कारखान्याचे प्रमुख अरुण अण्णा लाड यांचा, शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ऊसाच्या दरावरून शेतकरी संघटना विरुद्ध सरकार आणि साखर कारखाने असा संघर्ष चिघळण्याची चिन्हं आहेत. ऊसाला 3500 रुपयांचा पहिला हप्ता मिळावा, या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत.

Loading...

तर ऊसाच्या भावावरून सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातच एकवाक्यता नाही. त्यामुळे ऊसदर ठरवण्यासाठी बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णयच होऊ शकलेला नाही. आता येत्या ८ नोव्हेंबरला पुढील बैठक होणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार