fbpx

शिवसेनेचे डोकं ठिकाणावर आहे का ? राष्ट्रवादीचा सवाल

टीम महाराष्ट्र देशा- शेतकऱ्यांना पिकविमा कंपन्यांची रक्कम मिळाली नाही म्हणून शिवसेनेने विमाकंपन्यांविरोधी मुंबईत मोर्चा काढला. मात्र, खरीप हंगामातील विम्याची मागणी असताना रबी हंगामाच्या पिकविमा कंपनीवर शिवसेनेने मोर्चा काढला. यातून शिवसेनेचे वागणं हे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशा शब्दात राष्ट्रवादी मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांनी शिवसेनेला कानपिचक्या दिल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजवर यासंदर्भातील पोस्ट करण्यात आली आहे. ज्यांनी खरीपाचे पैसे घेतले त्यांच्याकडे पैसे मागायला न जाता रब्बीचे पैसे घेतलेल्या कंपन्यांवर मोर्चा काढला जातो. यातून शिवसनेनेचे डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल भोंगळे यांनी उपस्थित केला. मागील चार पाच वर्षातील शिवसेनेची शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेली भूमिका ही केवळ नाटकी, ढोंगी, दुटप्पी अशा प्रकारची आहे. शेतकऱ्यांविषयी तसूभरही प्रेम नाही, याचे उत्तर बळीराजा नक्कीच देईल असे डॉ. सुधीर भोंगळे म्हणाले.