fbpx

शमी, जडेजाला सेमिफायनलमध्ये संधी द्यावी, मास्टर ब्लास्टरची अपेक्षा

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या विश्वचषकामध्ये टीम इंडिया भलत्याच फॉर्मात आहे, आपल्या ९ साखळी सामन्यांमध्ये ७ विजय आणि एक पराभव स्वीकारत दिमाखात सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज न्यूझीलंड सोबत होणाऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला प्लेईंग इलेव्हन मध्ये घेण्याची भावना , मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने व्यक्त केली आहे.

सचिन म्हणाला की, मी शमीला खेळवण्याचे समर्थन करतो. कारण याच मैदानावर शमीने वेस्ट इंडिज विरोधात जबरदस्त कामगिरी केली होती. ओल्ड ट्रॅफर्डवर मोहम्मद शमीचा अनुभव खूप चांगला आहे. त्यामुळे त्याला खेळवावं, अशी भावना सचिनने बोलून दाखवली. विराट कोहली देखील मोहम्मद शमीला खेळवण्यासाठी उत्सुक असेल, असेही सचिन म्हणाला.

सोबतच सचिनने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला देखील अंतिम 11 मध्ये समाविष्ट करावे असा सल्ला दिला आहे. सचिन म्हणाला की, जाडेजा एक चांगला पर्याय आहे. जर दिनेश कार्तिक नंबर सातवर फलंदाजी करू शकतो तर जाडेजा देखील या जागी चांगला पर्याय आहे. मोठ्या सामन्यात आपल्याला एका कव्हरची गरज असते कारण आपण केवळ पाच गोलंदाजांसह खेळत आहोत. यासाठी जाडेजा एक चांगला पर्याय आहे, असे सचिन म्हणाला.