मनसे कॉंग्रेससोबत गेली तर उरले सुरलेले मतदारही दुरावतील : सुधीर मुनगंटीवार

sudhir mungantiwar

टीम महाराष्ट्र देशा :  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यावर असताना कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीं यांची भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटी नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधान आल आहे. तर अनेक नेत्यांनी ठाकरे – गांधी भेटीबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना सावधानतेचा सल्ला दिला आहे. माणसे जर कॉंग्रेस सोबत गेले तर राहिलेले मतदारही त्यांच्याकडून दुरावतील असं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केल आहे.

यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला, आधी अप्रत्यक्ष मतं मागितली होती, आता थेट मतं मागतील. मनसे काँग्रेस सोबत गेला तर अजून नुकसान आहे. काँग्रेसची जनमानसातली प्रतिष्ठा संपली असून विश्वसनियता देखील राहिली नाही. त्यामुळे मनसे काँग्रेससोबत गेली तरीही काहीही फरक पडणार नाही, अस ते म्हणाले.

दरम्यान सोमवारी राज ठाकरे यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने विरोध केला होता. मात्र आता राज ठाकरे हे थेट सोनिया गांधींच्याच भेटीला गेल्याने मनसेला महाराष्ट्रातील महाआघाडीत सामावून घेण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होण्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.