fbpx

मुख्यमंत्रीपदावरून सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्रीपदावरून सदाभाऊ खोत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. विधानसभेसाठी आमचा कॅप्टन ठरलाय असा टोला खोत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयरी सुरु केली आहे. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपात शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. याचदरम्यान सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. विधानसभेसाठी आमचा कॅप्टन ठरलाय. येणारी विधानसभा निवडणूक आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत, असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेनाच बाजी मारेल आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होतील, असेही त्यांनी म्हंटले.

सांगली जिल्ह्यातील विकासकामांसाठी 7 कोटी मंजूर केल्याप्रकरणी गावकऱ्यांकडून सदाभाऊ खोत यांची उंटावरून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.