प्रत्येक तालुक्यात एकतरी वृद्धाश्रम – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा – प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी वृद्धाश्रम सुरू करण्याचे शासनाचे धोरण असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी सांगली जिल्हा आढावा बैठकीत दिली.
रामदास आठवले म्हणाले, सध्या सांगली जिल्ह्यामध्ये एकच शासकीय वृद्धाश्रम आहे. 50 लोकांसाठीच्या या वृद्धाश्रमात जागा कमी पडत असल्याने प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी वृद्धाश्रम सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

bagdure

अनिकेत कोथळे खून प्रकरणामुळे पोलिस खात्याला कलंक लागला आहे. कायद्याने थर्ड डिग्री वापरता येत नाही. काही पोलिस ती वापरतात. अशा पोलिसांना कामावर ठेवूच नये. या घटनेबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटून आरोपींना फाशी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, आयुक्ते रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी सचिन कवले, राधाकिशन देवरे आदी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...