आम्हालाही मोजू द्या तुमचे कार्यकर्ते तरी किती आहेत ; राजू शेट्टींचा जानकरांना टोला

blank

टीम महाराष्ट्र देशा : सध्या महाराष्ट्रात दुधावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे राजू शेट्टी यांनी दुधाला वाढीव दर मिळावा म्हणून मुंबईला दुधाचा पुरवठा खंडित करण्यासाठी आंदोलन पुकारलं आहे. राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, “मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही, संरक्षण दिलं जाईल, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत.” असं म्हणत या आंदोलनाला महादेव जानकर यांनी आव्हान दिल आहे.

तर याला प्रतिउत्तर देताना शेट्टी म्हणाले कि,’ तुमचे कार्यकर्ते मैदानात उतरावाच आम्हांलाही मोजू द्या  तुमचे किती कायकर्ते आहेत.’ आता राजू शेट्टी यांच्या उपहासात्मक टोल्याला जानकर कसे उत्तर देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दूध उत्पादकांना पाच रुपये वाढीव दर देण्यात यावा तसेच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे, या मागणीसाठी मुंबईची दूध कोंडी करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीपासूनच या आंदोलनाला सुरवात झाली आहे.

तर मागणी मान्य न झाल्याने राजू शेट्टी यांनी रविवारी रात्रीपासूनच दूध पुरवठा बंद आंदोलन पुकारलं असून राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसेच गालबोट देखील लागलं आहे.

अन्यथा १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार – राजू शेट्टी

दूध दरवाढीवर स्वाभिमानी आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या फोडल्या

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाप भाजपला लागल्याशिवाय राहणार नाही- राजू शेट्टी