मुंबई : अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकल्यानंतर सोशल मीडियासह आता यावर मानेंच्या बाजुने इतर सहकलाकार एकवटले आहेत. त्यांनी स्पष्टपणे किरण माने हे एक चांगले कलाकार आहेत आणि त्यांचे सेटवरचे वर्तनही चांगले असल्याचं म्हटलं आहे. आता पुन्हा मानेंबद्दल चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीने एक निवेदन प्रसिद्ध केलं. यात किरण माने यांना महिला सहकलाकारांशी गैरवर्तन केल्यानं काढून टाकल्याचं सांगण्यात आलं. त्याआधी दिग्दर्शकांसह टीमनेही किरण माने यांना तीन वेळा समज दिल्याचं आणि तरीही वर्तन न सुधारल्यानं काढल्याचं सांगितलं होतं. शिवाय मालिकेतील कलाकार सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनीही ते टोमणे मारतात आणि वागणं चांगलं नव्हतं असं म्हटलं होतं. अलिकडे राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या सहकलाकारांचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
कलाकर कल्याणी केळकर (Kalyani Kelkar) यांनीही किरण माने यांच्याबद्दल बोलतांना म्हणाल्या एक व्यक्ती, सहकलाकार म्हणून ते उत्तम आहेत. त्यांचं सेटवरचं वागणंही अतिशय चांगलं आहे. सहकलाकाराशी समजून घेणं, चांगल्या गोष्टी सांगणं ते करतात. एक स्त्री म्हणून सव्वा वर्षात त्यांनी माझ्याशी कोणतीही वाईट वर्तणूक झालेली नाही. त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून कधीच झाली नाही. मला उत्तम व्यक्ती आणि सह कलाकार वाटतात असं कल्याणी यांनी सांगितलं. कल्याणी केळकर या मुलगी झाली हो मालिकेत आत्याची भूमिका साकारत आहेत. तसेच त्या मालिकेतील कलाकारांनी मानेंच्या वागणूकीबद्दल काहीच त्रास नसल्याचं ही व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
“भाजप राजकीय फायद्यासाठी जातीय चौकटीत बांधू पाहतेय”, संजय राऊतांची टीका
“भाजप पुढाऱ्यांना दलितांच्या घरी जेवल्याचा बोभाटा करावा लागतो, याचाच अर्थ त्यांच्या मनात ‘जात’ आहे”
जितेंद्र आव्हाडांनी घेतली किरण मानेंची बाजू म्हणाले, “वागणुकीमुळे नाही तर…”
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’; रवी राणांचा शिवसेनेवर हल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल