fbpx

खैरेंच मानसिक संतुलन बिघडलं – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर वडिल आणि वाहिनीची हत्या केल्याचा आरोप केल्यानंतर जाधव यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खैरेंचे मानसिक संतुलन बिघडल्याचे प्रतिउत्तर हर्षवर्धन जाधव यांनी दिले. तसेच खैरेंनी स्वतःची तपासणी करावी असा सल्लाही हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

“चंद्रकांत खैरे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांनी स्वतःची तपासणी लवकर करावी. माझ्या वडिलांचा मृत्यू ह्रदय विकाराच्या धक्क्याने झाला. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात अनेक दिवस उपचार सुरु होते.” असे हर्षवर्धन जाधव यांनी फोनवरुन खैरेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले.

शनिवारी (8 जून) औरंगाबाद जिल्हा शिवसेना शाखेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात हर्षवर्धन जाधव यांच्यावर वडिलांना आणि वहिनीला मारुन टाकल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. खैरेंच्या या आरोपामुळे औरंगाबाद शहरात मोठा राजकीय भुकंप झाला. दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाला कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जबाबदार धरत, त्यांच्यावर आरोप केले होते.