कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग रखडवला !

टीम महाराष्ट्र देशा : पुणे सातारा रस्त्यावरील फेररचनेसाठी बंद ठेवण्यात आलेला कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग आता नववर्षात म्हणजे जानेवारी २०१९ मधेच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्ग खुला करण्याचे १ मे, १ जून आणि १ ऑगस्ट असे तीन मुहूर्त हुकले आहे. पीएमपीएल कडे बीआरटी स्वरूपातील बसेस अपुऱ्या असल्याने जानेवारीत नव्या बसेसची पहिली खेप आल्यानंतरच हा मार्ग खुला करणे शक्य होणार आहे. त्यामळे प्रशासनाकडून हेतुपुरस्कर रित्या या मार्गाचे काम राखडवण्यात येत असल्याचे बोले जात आहे.

शहर व पिंपरी चिंचवड मधील सर्व बीआरटी मार्गावर संचलनासाठी 1050 बसची गरज आहे. सध्यस्थितीला पीएमपीएल कडे बीआरटी स्वरूपातील 757 बस आहे. यामुळे साधारण बीआरटी मार्गासाठी लागणाऱ्या बसची संख्या 300 ने कमी असल्याने यामार्गवर बस सोडताना पीएमपीएल प्रशासनाला दमछाक होत आहे. अशातच निगडी दापोडी बीआरटी मार्ग नव्याने सूर करण्यात आल्याने बीआरटी मार्गांचे नियोजन पुरते कोलमडले आहे.

पीएमपीएल प्रशासनला कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग संचलनासाठी तब्बल १०० बीआरटी स्वरूपातील बसेसची आवश्यकता असणार आहे. सध्याच्या पीएमपीएलच्या ताफ्यात असलेल्या ७५७ बीआरटी बसच्या संख्येत नव्या कोणत्याही मार्गाचे संचलन करणे प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे प्रशासनकडून ४०० बीआरटी स्वरूपातील सीएनजी बस खरीदीची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. तर पीएमपीएल ५०० ई-बस भाडेतत्वार घेणार आहे. ह्या बसची पहिली खेप जानेवारी मध्ये ताफ्यात दाखल होईल. त्यानंतर कात्रज- स्वारगेट बीआरटी मार्ग सुरु करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.