मोहोळमध्ये जनहित संघटनेचे आंदोलन; आयसीआयसीआय बँकेच्या अधिकार्यांना तीन तास कोंडले

टीम महारष्ट्र देशा – शेतकर्यांना देण्यात येणारा दुष्काळ निधी व अतिवृष्टीच्या निधीस जाणीवपूर्वक विलंब करणारे मोहोळचे तहसीलदार व बॅक अधिकार्यांना निलंबीत करावे, अशी घोषणाबाजी करत जनहीत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर तथा भैया देशमुख व संतापलेल्या कार्यकत्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या अधिकार्यांना तीन तास कोंडून ठेवले.

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने येत्या ५ ते ६ दिवसात शेतकर्यांना अनुदान वितरित करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस निरीक्षकांमार्फत दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Loading...

अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकर्यांसाठी शासनाकडून जाहीर झालेल्या अनुदानाचे २१ कोटी ३७ लाख ६० हजार रुपये जमा होऊन एक महिना उलटून गेला तरीसुद्धा अद्याप अनेक शेतकर्यांच्या खात्यावर पैसे न जमा झाल्यामुळे मोहोळ तालुका जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने कालपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या बाबत २१ कोटी ३७ लाख ६० हजार रुपये अनुदान शासनाकडून आले असून ते बँकेमध्ये जमा केल्याचे लेखी पत्र तहसीलदारांनी दिल्यानंतर जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यारकमा कोणत्या बँकेत जमा केल्या आहेत, याची माहीती घेऊन आयसीआयसीआय बँकेत रकमा जमा केल्याचे लक्षात आल्यानंतर भैया देशमुख यांनी अंदोलक शेतकर्यांसह बँकेत जावुन संबंधित बँकेच्या अधिकार्यांकडे चौकशी केली आसता उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे संतापलेल्या शेतकर्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या अधिकार्यांना कोंडून त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.

या घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या बँक अधिकार्यांनी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान अंदाजे २१ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगत त्यापैकी दहा कोटी ९१ लाख एवढी रक्कमशेतकर्यांच्या खात्यावर जमा केली असल्याचे सांगत उर्वरित दहा कोटी रक्कमबँकेच्या खात्यावर जमा असून तहसीलदार यांनी त्याबाबतच्या याद्या दिल्या नाहीत, असे सांगितले.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निकमशामराव पाटील, उत्तममुळे, युवक अध्यक्ष नानासाहेब मोरे, शिवाजी जाधव, सुधाकर पवार, सिद्धेश्वर भालेराव, सिद्रामवाघमोडे, ओंकार शिंदे, संजय मोरे, रामभाऊ शिरगिरे,श्रीपती डूणे,बाळू गोवर्धनकर,मोहन रणदिवे,तानाजी मुळे, हरिभाऊ लोंढे, विक्रमगायकवाड,सुनील चव्हाण, सुनील झांबरे, प्रशांत पाटील उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...