निष्ठावंत फक्त सतरंज्या उचलणार? संधिसाधू क्षीरसागरांना मंत्रीपद देण्यावरून सेनेत नाराजी

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांपैकी बहुतेक जण विधान परिषद आमदार आहेत, त्यामुळे जनतेतून निवडणूक लढवत जिंकलेल्या विधानसभा आमदारांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, बीड विधानसभेची जागा युतीमध्ये शिवसेनेकडे असल्याने त्यांनी भाजपमध्ये न जाता सेनेत प्रवेश केला. बीड लोकसभेच्या भाजप उमेदवार खा. प्रतीम मुंडे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. आगामी विधानसभा निवडणूक पाहता मराठवाड्यात पक्षाची ताकद आणखीन वाढवण्यासाठी क्षीरसागर यांना मंत्रीपद देण्याची तयारी शिवसेनेकडून दाखवण्यात आली आहे.

दरम्यान, क्षीरसागर यांना पक्ष प्रवेश केल्यापासून एका महिन्याच्या आतच मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता असल्याने सेनेतील अनेक आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. तर आधीच सरकारमध्ये मंत्री असणारे अनेक जण विधान परिषद आमदार आहेत, त्यामुळे जनतेतून निवडणूक लढवत आम्ही काय गुन्हा केला का ? असा सवाल इतर आमदार खाजगीत करताना दिसत आहेत.

नाव न छापण्याच्या अटीवर एका शिवसेना आमदाराने आपली नाराजी ‘महाराष्ट्र देशा’कडे व्यक्त केली आहे. नाराज आमदाराच्या म्हणण्यानुसार ‘२०१४ साली युती तुटल्यावरही आम्ही ६३ आमदार निवडून आलो आहोत. निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादीसह भाजपचा सामना देखील आम्हाला करावा लागला. गेली साडेचार वर्षे सर्व सेना आमदारांना सत्ताधारी कमी आणि विरोधकांच्या भूमिकेत जास्त रहावे लागले. सुरुवातील पक्षाच्या वाट्याला आलेल्या अनेक मंत्रीपदावर विधान परिषद आमदारांची वर्णी लागली आहे. आता शेवटच्या टप्यात मंत्रीमंडळ विस्तारात पक्षनिष्ठ विधानसभा आमदारांना संधी मिळावी अशी आमची इच्छा

विधान परिषदेतील आमदार असणारे शिवसेना मंत्री
-दिवाकर रावते
-सुभाष देसाई
-रामदास कदम
-माजी मंत्री दीपक सावंत