कॉंग्रेसचा बालिशपणा, ‘चांद्रयान 2’चे श्रेय दिले नेहरू आणि मनमोहन सिंगांना

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे आणि जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘चांद्रयान 2’ चे आज श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण झाले आहे. दुपारी 2:43 वाजता ‘चांद्रयान 2’ झेपावले आहे. भारताच्या महत्वकांक्षी मोहिमेला अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता यशस्वीरित्या झालेल्या प्रक्षेपणानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. तर कॉंग्रेसने भारतच्या आणि इस्त्रोच्या मोहिमेचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading...

श्रीहरीकोटा येथून चंद्रयान -2 सोडल्यानंतर काँग्रेसने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि डॉ. मनमोहन सिंग यांना या मोहिमेचे श्रेय दिले. ट्विटमध्ये कॉंग्रेसने नेहरू यांना 1962 मध्ये इन्कोस्परद्वारे ‘स्पेस रिसर्च फंडिंग’ साठी श्रेय दिले आणि मनमोहन सिंग यांनी 2008 मध्ये चंद्रयान -2 प्रकल्पाची मंजूरी देण्यासाठी पाठिंबा दिल्याच म्हंटल आहे. कॉंग्रेसच्या या श्रेय लाटण्याच्या ट्विटनंतर हे ट्विट नेटकरी मंडळींनी चांगलेच ट्रोल केले आहे.

दरम्यान ‘चांद्रयान 2’ भारताची महत्वकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेमध्ये ‘चांद्रयान 2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करणार आहे. तसेच सजीव सृष्टीस आवश्यक असणाऱ्या पाण्याचा देखील शोध घेणार आहे. उड्डाणानंतर मोहिमेचे १५ टप्पे असून त्यात ४५ दिवसांच्या काळात हे यान चंद्राच्या कक्षेत जाईल. शेवटच्या १५ मिनिटांत ‘चांद्रयान-२’ तेथील दक्षिण ध्रुवावर गिरक्या घालत राहील व नंतर रोव्हरसह तेथे अलगद अवतरण करील.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’