fbpx

दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्या,दुध उत्पादक संघाची मागणी

पुणे : एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्याच्या किंमतीत झालेली लक्षणीय वाढ यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे कमीतकमी पुढील तीन महिन्यांसाठी सरकारने 5 रूपयांचे अनुदान द्यावे त्यामुळे शेतकºयांना ३० रुपये लिटरप्रमाणे भाव देता येईल, असे दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सभागृहात बैठक झाली. त्यात दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, गायीच्या दूध दरामधे प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभेत मंगळवारी घेण्यात आला. ही दरवाढ येत्या ८ तारखेपासून लागू होणार आहे.