कोंबडी अंडी देईना, कंपनी भरपाई देईना; बारामती अॅग्रोचे फीड देणे पडले महागात

rohit pawar scam

पुरंदर – बारामती अॅग्रोचे फीड दिल्या नंतर कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याचा धक्कादायक आरोप एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. बारामती अॅग्रोमुळे पुरंदरसह अन्य तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसल्याचा दावा एका तरुण शेतकऱ्याने केला आहे.

पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नांना योगेश चौरे या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यामतून वाचा फोडली आहे. शेतकऱ्यांनी बारामती अॅग्रोकडे तक्रार केली मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप देखील चौरे यांनी केला आहे.

रोहित पवार यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. पोल्ट्री व्यावसायिक अडचणीमध्ये असताना पवार हे साधी शेतकऱ्यांची भेट देखील घेत नसल्याने व्यथित झालो आहोत असे देखील चौरे म्हणाले. पोल्ट्री व्यवसायिकांचे झालेले लाखोंचे नुकसान भरून द्यावे अशी मागणी देखील चौरे यांनी केली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणामुळे आ. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या कारभारावर प्रश्न उपस्थित राहु लागले आहे. चौरे यांच्या बोलण्यातून पोल्ट्री व्यावसायिकांची जराशीही दखल न घेणाऱ्या या कंपनीसोबत व्यवसाय करणे किती महागात पडू शकते याची प्रचीती येत असल्याचे दिसून येत आहे. कोंबडी अंडी देईना, कंपनी भरपाई देईना अशी काहीशी अवस्था या व्यावसायिकांची झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

महत्वाच्या बातम्या 

IMP