फेशियल रेकग्निशन – तुमचा चेहराच असेल फेसबुकचा पासवर्ड

india no 1 in use of facebook

फेसबुक आपल्या युजर्सला सतत  अपडेट ठेवत असतो. युजर्सला त्याचे अकाऊंट सुरक्षित राहावे या करिता नेहमीच काहीना काही नवीन पर्याय उपलब्ध करून देत असतो. लवकरच फेसबुक असे एक नवीन फिचर आणार आहे ज्यामुळे फेक अकाऊंट पकडले जाऊ शकतात.

फेक अकाऊंटवर कारवाई करण्यासाठी फेसबुकने फेस रिकग्नेशन या फिचरची चाचणी सुरु केली आहे. त्यामुळे युजर्सना आपला चेहरा स्कॅन करून फेसबुक अनकलॉक करता येणार आहे. ‘टेकक्रंच’ने फेसबुकच्या या नव्या फीचरबद्दल माहिती दिली आहे. फेसबुकसाठी फेशियल रेकग्निशन हे तंत्र काही नवं नाही. तुमच्या सोबत फोटोमध्ये इतर मित्र मैत्रीणी असतील तर त्यांची नाव काय आहेत हे फेसबुक अगदी अचूक ओळखतो. तेव्हा एखाद्या मित्राला टॅग करताना तुम्हाला त्याच्या नावाची शोधाशोध करावी लागत नाही. आता याच फीचरचा वापर लॉग इन करण्यासाठी होऊ शकतो का, याची चाचणी सुरू आहे. हे फीचर कधी येईल याची तुर्तास तरी माहिती उपलब्ध नाही. अॅपलने सप्टेंबर महिन्यात अॅपल x हा फोन लाँच केला होता. यात फेशियल रेकग्निशनचे फीचर देण्यात आलं आहे. अशाच प्रकारचं फीचर फेसबुकमध्येही उपलब्ध होणार याची चर्चा असल्याने अनेकांना याबद्दल उत्सुकता आहे.