fbpx

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात मिळणार पाईपद्वारे घरगुती गॅस

टीम महाराष्ट्र देशा- पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातल्या चारशे सहा जिल्ह्यांमध्ये घरगुती वापराचा गॅस पुरवठा पाईपद्वारे करण्यासाठी परवानगी दिली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. परवानगी मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, आणि अहमदनगर सह एकोणीस जिल्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, बृह्नमुंबई, ठाणे, पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि लगतचे हिंजेवाडी, चाकण, तळेगाव क्षेत्र या पैकी काही ठिकाणी आधीपासून नैसर्गिक गॅस पुरवठा होतो आहे. त्याच्या हद्दीत वाढ करण्यात आली आहे.