मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) अलिकडे वादाच्या भोवऱ्यात आडकली आहे. मनी लॉंड्रींग केसचा आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतची (sukesh chandrashekhar) जवळीक यामुळे जॅकलिन अडचणीत आली आहे. आता तिला सतत चौकशीसाठी ईडीच्या (ED) ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहे. तसेच तिच्या अफेअर मोठी (affair list) यादी समोर येत असल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर सुकेशकडून महागडे गिफ्ट घेण्याचा आरोप आहे. असाही दावा केला जात आहे की, जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, जॅकलिनने हे नाकारलं आहे. मात्र जॅकलिन आणि सुकेशचे काही फोटो लीक झाल्यामुळे त्यांचं नातं होतं असं तरी दिसतंय. जॅकलिन आणि सुकेशचे फोटो सोशल मीडियावर लीक झाले असून दोघेही रोमॅंटिक, किसींग पोज देताना दिसत आहेत. जॅकलिनला सुकेश किस करताना दिसत आहे, यामुळे दोघांच्या नात्यावर चर्चा होत आहे.
जॅकलिनच्या अफेअर्सची लिस्ट मोठी असून प्रेमप्रकरणात सर्व प्रथम प्रिन्स ऑफ बहरीन, शेख हसन बिन रशिद अल खलीफा यांच्या अफेअर असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर दिग्दर्शक साजिद खानसोबतही रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही सीरिअस रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. अनेक वर्ष ते सोबत होते. अनेक इव्हेंट्समध्ये दोघे सोबत दिसत होते. मात्र, साजिदच्या पझेसिव्ह वागण्यामुळे दोघांचं ब्रेकअप झालं.
तसेच सलमान खान (Salman khan) आणि जॅकलिनने (Jacqueline Fernandez) अनेक सिनेमात एकत्र काम केलं. दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये कोविड लॉकडाऊनच्या काळात जॅकलिन,सलमान आणि त्याच्या परिवारासोबत राहिल्याने सलमानच्या नात्याची नेहमीच चर्चा होतेय.
जॅकलिनने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत अजेंटलमन सिनेमात काम केलं होतं. यादरम्यान दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. जॅकलिनच्या अफेअर मोठी लिस्ट आहे. मात्र जॅकलिनने कधीही जाहीरपणे या अफेअरबाबत काहीही सांगितलं नाही. ती केवळ तिच्या नात्यांना मैत्रीचं नाव देत होती. यामुळे तिच्या बद्दल चर्चा रंगत असतात.
महत्वाच्या बातम्या:
- “मराठी भाषा आणि संस्कृतीचे शत्रू आपल्याच घरात”, शिवसेनेने विरोधकांना सुनावले
- फडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा? रुपाली ठोंबरेंचा टोला
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका
- “…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका
- मुंबईत ओमायक्रॉनची लाट? टास्क फोर्स म्हणते…
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<