अंकिता पाटील याचा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमधून पत्ता कट

टीम महाराष्ट्र देशा:-काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती मधून पत्ता काटण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्या म्हणून अंकिता पाटील या नुकत्याच निवडून आल्या होत्या. त्यांची सर्वांत तरूण सदस्य म्हणून आज निवड करण्यात येणार होती. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपच्या प्रवेशाला उधान आल्यामुळे अंकिता यांचा पत्ता आधीच काटण्यात आला आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्या होत्या.त्यांच्या निधनानंतर अंकिता या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या होत्या. त्यामुळे अंकिता पाटील यांची स्थायी समतीत निवड करण्याचे ठरले होते. पण हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपच्या प्रवेशाला उधान आल्यामुळे त्यांच्या पत्ता कट करण्यात आला आहे.

त्यामुळे आत्ता कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांनी अंकिता पाटील यांच्याऐवजी दत्ता झुरुंगे यांची निवड करावी असे पत्र पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकते यांना दिले आहे. झुरुंगे हे कृषी समितेचे सदस्य आहेत.एका सदस्याला एकाच समितीवर जाता येते. त्यामुळे झुरुंगे यांचा कृषी समितीचा राजीनामा घेत तो तातडीने मंजूर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर घुले यांनी ही झुरुंगे यांच्या राजीनामा मंजूर झाल्याचे सांगितले. अंकिता पाटील यांच्या पत कट करणे हा कॉंग्रेस साठी मोठा धक्का असून या मुळे हर्षवर्धन पाटील यांची विधानसभा निवडणुकीच्या तोडावर मोठी गोची झाली आहे.

दरम्यान इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पेच फसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील या जागेवरून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र २०१४ पासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. इंदापूर मतदार संघातून सलग चार वेळा हर्षवर्धन पाटील हे निवडून आले होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन यांना पराभूत केले.त्यामुळे सहाजिकच राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदार संघावर दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. ही जागा राष्ट्रवादी न सोडल्यास हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादीने जागा न सोडल्यास हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.