ब्रायन लाराने दिली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट

टीम महाराष्ट्र देशा : इंगलंड मध्ये सुरु असणाऱ्या विश्वचषकाची अनेक खेळाडू मजा घेत आहेत. मात्र वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा हा वेळात वेळ काढून चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देयला आला आहे. भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याचे ताडोबातले फोटोग्राफ्स पाहून लाराला ताडोबाला यावेसे वाटले आहे.

आठवडाभरापूर्वी भारताचा गोलंदाज अनिल कुंबळे ताडोबात येऊन गेला होता. ताडोबातील जंगलाचे आणि वाघाचे फोटो त्याने लारालादाखवले. ते फोटो पाहून लारा कुंबळेला म्हणाला की, मलाही ताडोबाला जायचे आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये लारा समालोचन करत आहे. या व्यस्तवेळपत्रकातून त्याने वेळ काढला आणि थेट चंद्रपूरमध्ये पोहोचला.

Loading...

मंगळवारी रात्री लारा ताडोबात पोहोचला. त्याने कोलारा गेटवरील गेस्टहाऊसला मुक्काम केला. बुधवारी सकाळी तो सफारीला निघाला. तेव्हा वाघासह अस्वल, रानकुत्रे असे अनेक प्राणी त्याला दिसले. अनेक पक्षीही त्याने पाहिले. ताडोबाचे जंगल त्याला इतके आवडले की ‘बरे झाले मी दोन दिवसाची सुटी काढून येथे आलो’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...