शाहरूखच्या रेड चिलीजवर पालिकेचा हातोडा

mumbai/bmc-demolishes-actor-shah-rukh-khans-illegal-cantee

सुपरस्टार शाहरुख खानच्या रेड चिलीजच्या दोन हजार चौरफ फूट जागेवरील अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडलं असून महापालिकेच्या पी दक्षिण विभागाने ही धडक कारावई केली आहे. गोरेगाव पश्चिम परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली आहे . यामध्ये शाहरूखच्या रेड चिलीजवर देखील पालिकेने कारवाई केली.
डीएलएच पार्क या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे.महापालिकेने कारवाई केलेल्या भागात अतिक्रमण करुण अंतर्गत स्वरुपातील उपहारगृह चालवलं जात होतं.