मुंबई : छोट्या पडद्यावरील बिग बॉस शो लोकप्रिय आहे. आता बिग बॉस शो १५ वा (Bigg Boss 15) पर्व सुरू आहे. घरातील सदस्य अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत असतो. बऱ्याच वादग्रस्त वक्तव्यांमुळे बिचुकलेस ट्रोलही करण्यात आलं आहे. आता मात्र तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. घरातील सदस्य तेजस्वी प्रकाशने (Tejaswi Prakash) बिचुकलेच्या संदर्भात नुकताच मोठा खुलासा केला आहे.
बिग बॉस १५ चा नुकतच प्रसारित झालेल्या एका प्रोमोमध्ये, घरातील ‘पर्दाफाश रिपोर्टिंग’ दाखवण्यात आलं आहे. ज्यात घरातील सदस्य एकमेकांची पोलखोल करताना दिसत आहेत. या टास्कमध्ये तेजस्वी प्रकाश अभिजित बिचुकलेबाबत एक धक्कादायक खुलासा करत आहे. तेजस्वी सांगते की, ‘अभिजित बिचुकलेनं एका म्युझिक व्हिडीओसाठी ६ तासांचा किसिंग सीन (kissing scene) दिला आहे.’ तेजस्वीचा बिचुकलेबाबतचा हा खुलासा ऐकल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून सगळेच चकित झाल्याचं चित्र दिसत आहे.
दरम्यान याच एपिसोडमध्ये घरातील सदस्यांना काही पत्रकार प्रश्न विचारताना दिसणार आहेत. या एपिसोडच्या प्रोमोमध्ये रश्मि देसाई आणि अभिजित बिचुकले यांच्या जोरदार वाद झालेला पहायला मिळतो. पत्रकारांच्या प्रश्नवर रश्मि देसाई, अभिजित बिचुकलेचे महिलांबाबत अतिशय वाईट विचार आहेत असं बोलताना दिसते. ज्यावर बिचुकले तिच्यावर भडकतो आणि तिचं पूर्ण कुटुंब मूर्ख आहे असं म्हणतो.
या प्रोमोत बिचुकले घरातील सदस्यांशीच नाही तर गेस्टसोबतही बेशिस्तपणा करत, उलट उत्तर देताना दिसतो. ज्यामुळे सलमान खान आणि अभिजित बिचुकले यांच्यात वाद होतात. घरातील सदस्यांसोबतच सलमान खानही या प्रोमो व्हिडीओमध्ये अभिजित बिचुकलेवर चिडलेला दिसत आहे.आता आगामी भागात त्याच्याबद्दल आणखी काय ऐकायला मिळेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढवित आहे.
महत्वाच्या बातम्या
“भाजप राजकीय फायद्यासाठी जातीय चौकटीत बांधू पाहतेय”, संजय राऊतांची टीका
“भाजप पुढाऱ्यांना दलितांच्या घरी जेवल्याचा बोभाटा करावा लागतो, याचाच अर्थ त्यांच्या मनात ‘जात’ आहे”
जितेंद्र आव्हाडांनी घेतली किरण मानेंची बाजू म्हणाले, “वागणुकीमुळे नाही तर…”
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’; रवी राणांचा शिवसेनेवर हल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल