आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांची ओवेसीसाठी प्रार्थना

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची तब्येत खालावली आहे. अकबरुद्दीन ओवैसी हे एमआयएम अध्यक्ष असउद्दीन ओवेसी यांचे बंधू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अकबरुद्दीन ओवैसी हे आजारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ओवेसी यांच्यावर तेलंगणातील चांद्रगुगुट्टू येथे उपचार सुरू होते. परंतु, इथे फरक न पडल्याने त्यांना तात्काळ लंडनला हलवण्यात आले. लंडन येथील रुग्णालयामध्ये आता त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे बंधू असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. ‘द हिंदू‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कार्यकर्त्यांना आपला भाऊ अकबरुद्दीन यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केल्यानंतर आता, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनीही ट्विटरवरुन म्हटले की, अकबरुद्दीन ओवेसी यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.