अमिताभ बच्चन यांनी २१०० शेतकऱ्यांना केलं कर्ज मुक्त

टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील २१०० शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं आहे. अमिताभ बच्चन यांनी कन्या श्वेता आणि सुपुत्र अभिषेकच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे दिली आहेत.

अनेक राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. डोक्यावर कर्जाचे ओझे असल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करत असतात दरम्यान अमिताभ बच्चन यांनी शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी बिहार राज्यातील २१०० शेतकऱ्यांचे कर्ज फेडलं आहे.

Loading...

या संदर्भात अमिताभ बच्चन यांनी स्वतः ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. माझं वचन पूर्ण केलंय. कर्ज परतफेड करण्यास असमर्थ असणाऱ्यांसाठी ही एक भेट आहे. ते बिहार राज्यातील असतील. बिहारमध्ये जे शेतकरी कर्जबाजारी होते, त्यापैकी २१०० जणांची निवड केली आणि ओटीएस (वन टाइम सेटलमेंट)च्या माध्यमातून त्या सर्वांचे कर्ज फेडले आहे असे अमिताभ बच्चन यांनी म्हंटले.

अमिताभ बच्चन यांनी या शेतकऱ्यांपैकी काही जणांना त्यांच्या ‘जनक’ या निवासस्थानी बोलावून त्यांची कन्या श्वेता आणि सुपुत्र अभिषेकच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्र दिले आहेत.

विशेष म्हणजे, यापूर्वीही अमिताभ बच्चन यांनी अनेकदा शेतकऱ्यांची मदत केलेली आहे. त्यांनी यूपीतील ३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं होतं. इतकेच नव्हे तर, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही त्यांनी केली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली