मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या (Aishwarya) यांच्या विभक्त (decision to separate) होण्याच्या निर्णयाने चाहत्यांना धक्का दिला. या जोडप्याच्या लग्नाला तब्बल १८ वर्षे झाली होती. धनुष आणि ऐश्वर्याने वेगळे होण्याची घोषणा केली आहे. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनीही यासंदर्भात माहिती दिली, असून याबद्दल ऐश्वर्याने एक पोस्ट शेअर केली असून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान या दोघांनी सोशल मीडियावर एक समान विधान शेअर केले असून ते वेगळे (separate) होत असल्याची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या विभक्त होण्यामागील कारण अजून उघडपणे सांगितले नाही. मात्र धनुष आणि ऐश्वर्याने सांगितले की त्यांना ‘व्यक्ती म्हणून (त्यांना) अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ काढण्याची गरज आहे.’
ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर धनुषसाठी एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. “मित्र, जोडपे, पालक आणि एकमेकांचे हितचिंतक म्हणून १८ वर्षे एकत्र राहिलो. आजवरचा प्रवास चांगला राहिला असून एकमेकांना समजून घेतले आहे. ऐश्वर्याने पतीसाठी शेवटच्या पोस्टमध्ये स्वतःला ‘पत्नी म्हणून अभिमान वाटतो’ म्हटले. वडील रजनीकांत नवी दिल्लीतील प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार सोहळयादरम्यान तसेच धनुषला असुरनमधील त्याच्या अभिनयासाठी मिळालेल्या पुरस्कारप्रसंगी २५ ऑक्टोबर रोजी, ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर दोघांचा एक फोटो शेअर केला आणि तिचा आनंद व्यक्त केला. ते माझे आहेत … आणि हा इतिहास आहे 💜💜#prouddaughter❤️ #proudwife, तिने या फोटोला कॅप्शन दिला होता. तिने पत्नीम्हणून खूप गर्व आहे, अशी भावना त्यावेळी व्यक्त केली. आता त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ऐन भाषण देताना टेलिप्रॉम्टर पडले बंद; पंतप्रधान मोदींचा उडाला गोंधळ
पहिल्या भेटीतच ऐश्वर्याला आवडला होता धनुष; जाणून घ्या त्यांची हटके लव्हस्टोरी
“नानांनी तालिबान्यांचा पक्ष जॅाईन केला का?”, चित्रा वाघ यांचा खोचक सवाल