fbpx

आदित्यसोबत डिनरला जाण्यात चुकीचं ते काय?

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याबरोबर डिनर डेटला गेल्यामुळे दिशा पाटणी सध्या चर्चेत आहेत. त्या दोघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.यावर आता दिशाने स्पष्टीकरण दिले आहे.

हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिशानं आपली बाजू स्पष्ट केली आहे. ‘तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का? यात चुकीचं ते काय? असा प्रश्न तिनं विचारला आहे. प्रत्येकाला मित्र किंवा मैत्रीणी असतात. मैत्री करताना तुम्ही तो मुलगा आहे की मुलगी हे पाहत नाही. मी केवळ मुलींशीच मैत्री करावी असं नाहीये’ दिशा आदित्य ठाकरेसोबत असणाऱ्या तिच्या मैत्रीविषयी म्हणाली.

‘मी अशा क्षेत्रात काम करते जिथे प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. आता लोक माझ्याविषयी चुकीचा विचार करतात याची मला पर्वा नाही. मी फक्त माझ्या कामावरच लक्ष केंद्रीत करते’ असंही उत्तर दिशानं ट्रोलर्सनां दिलं.